Dandgaon shook by the suicide of a 14-year-old boy! Graveyard in the village in peace

वर्धा नदीच्या (Wardha River) तीरावर असलेल्या छोट्याशा दांडगाव या गावामध्ये ह्रदयद्रावक घटना घडली. वेगवेगळ्या करणांनी मोठ्यांनी आत्महत्या केलेल्या बघितल्या. आता हा मोर्चा बालकांकडे वळल्याचे दिसत आहे. येथील एका १३ वर्षीय बालकाने आपल्या राहत्या घरी असलेल्या लोखंडी अँगलला दोराच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

    मारेगाव :  एका १४ वर्षीय बालकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by hanging ).  ही दुर्दैवी घटना ११ ऑगस्टला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

    मानस रामकृष्ण शेंबळकर (१४) असे आत्महत्या केलेल्या बालकाचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील दांडगाव (Dandgaon in Maregaon Taluka) येथे राहतो. तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत. ते थांबताना मात्र दिसून येत नाही. शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही. अशीच मन हेलावून टाकणारी घटना ११ ऑगस्टला घडली.

    वर्धा नदीच्या (Wardha River) तीरावर असलेल्या छोट्याशा दांडगाव या गावामध्ये ह्रदयद्रावक घटना घडली. वेगवेगळ्या करणांनी मोठ्यांनी आत्महत्या केलेल्या बघितल्या. आता हा मोर्चा बालकांकडे वळल्याचे दिसत आहे. येथील एका १३ वर्षीय बालकाने आपल्या राहत्या घरी असलेल्या लोखंडी अँगलला दोराच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असले, तरी ही घटना नक्कीच मनाला चटका लावून जाणारी आहे. मानस हार्दिक लहान असतांनाच त्याची आई त्याला सोडून गेली. त्यानंतर शेतमजूरी करणाऱ्या आपल्या वडिलांसोबत राहत होता. त्याला एक मोठा भाऊ असून तो १० व्या वर्गात शिकत आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरु आहे.