
अर्धा जून महिना कोरडा गेल्यानंतर मुंबईत पाऊस सुरू झाला असून सोमवारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर हवामान विभागाने मंगळवारीसुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरात सोमवारपासून अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू झाली. रविवारी रात्रीपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मुंबईसह किनारपट्टीच्या भागासाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे(Danger of torrential rains on Mumbai coast).
मुंबई : अर्धा जून महिना कोरडा गेल्यानंतर मुंबईत पाऊस सुरू झाला असून सोमवारी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तर हवामान विभागाने मंगळवारीसुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई आणि उपनगरात सोमवारपासून अनेक ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू झाली. रविवारी रात्रीपासून अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मुंबईसह किनारपट्टीच्या भागासाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे(Danger of torrential rains on Mumbai coast).
गेल्या अनेक दिवसांपासून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी शहरात हजेरी लावली. त्यानंतर ढगाळ वातावरण असले तरी पावसाने दडी मारली होती. मात्र, मुंबईत रविवारी पहिला मोसमी पाऊस झाला. सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत 24 तासांत सांताक्रूझ केंद्राने 12.5 मि. मी. तर, कुलाबा केंद्राने 67 मि. मी.पावसाची नोंद केली. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेने या हंगामात एकूण अनुक्रमे 219 मि.मी. आणि 127.8 मि.मी. पावसाची नोंद केली आहे.
ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे मुंबईतील तापमान कमी झाले आहे. त्यामुळे उकाडयापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. सांताक्रूझ केंद्राने कमाल तापमान 31.3 अंश सेल्सिअस तर, किमान तापमान 25 अंश सेल्सिअस नोंदविले आहे. कुलाबा केंद्राने कमाल तापमान 29.4 अंश तर, किमान 23.5 अंश सेल्सिअस नोंदविले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 23 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून त्यानंतर हलका ते मध्यम पाऊस पडेल.