Jivenegha travel over bamboo bridge built by villagers themselves, complaint to MLA Sameer Kunawar

याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी दाखल केल्या. मात्र, या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आजपर्यंत येथील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र कहर केला होता. त्यामुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहू लागले होते. त्यात नदीला पूल नसल्यामुळे झमखुली - ताडगाव या दोन्ही गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. प्रवास मार्ग बंद होत झाला होता.

  समुद्रपूर : ताडगाव (Tadgaon) येथील गावालगत असलेल्या नदीला पूल नसल्याकारणाने नदीच्या वेगवान पाण्यातून  शेतक-यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहेत. झमखुली – ताडगाव (Zamkhuli – Tadgaon) या दोन्ही गावाचा संपर्क पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांना मोठी अडचणी निर्माण होत असते. येथील शेतक-यांनी स्वतः तात्पुरता बांबूचा पूल बनवून मार्ग काढला आहे.

  ताडगाव येथील गावालगत असलेली नदीला अनेक वर्षांपासून पुल नाही. याबाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी दाखल केल्या. मात्र, या तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे आजपर्यंत येथील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. जुलै महिन्यात मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र कहर केला होता. त्यामुळे नदी, नाले तुडूंब भरून वाहू लागले होते. त्यात नदीला पूल नसल्यामुळे झमखुली – ताडगाव या दोन्ही गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला (Communication two villages was lost) होता. प्रवास मार्ग बंद होत झाला होता.

  गावालगत असलेल्या नदीवरून असंख्य शेतकरी जीवघेणा प्रवास अनेक वर्षांपासून करीत आहे. शेतकऱ्यांना शेती उपयोगी सर्व बि- बियाणे हे पावसाळ्याच्या गोदर शेतामध्ये साठा करून ठेवावा लागत असतो.  मात्र, यावर्षी जिल्ह्यात पावसाने चांगला कहर केल्यामुळे तब्बल १ महिन्याभर शेतक-यांसाठी हा मार्ग बंद झाला होता. जोपर्यंत पाणी कमी होत नाही तोपर्यंत शेतक-यांना शेतीचा वहिवाट मार्ग बंद झाला. याबाबत अनेकवेळा शेतक-यांना पुलाची मागणी केली होती. मात्र, त्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये चांगलाच रोष निर्माण होत आहे.  एखाद्या शेतकऱ्याचा दुर्दैवाने जीव गेल्यानंतर या प्रशासनाला जाग येईल, कसा प्रश्न संतापात गावकऱ्यांनी केला आहे.

  गावक-यांनी केला व्हिडिओ वायरल

  झमखुली – ताडगाव येथील गावालगत असलेल्या नदीला पूल नसल्याकारणाने अनेक वर्षांपासून येथील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतो. त्यात पावसामुळे या दोन्ही गावाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे येथील नागरिकांना स्वतःच तात्पुरता स्वरुपाचा बांबूचा पूल बनवून मार्ग काढला असून गावक-यांनी व्हिडिओ काढून सर्वत्र वायरल केला आहे.

  पुलाची केली मागणी

  आमदार- समीर कुणावर (MLA- Sameer Kunavar) यांना वायरल व्हिडिओचा (Viral video ) माध्यमातून येथील शेतक-यांनी केली मागणी. त्वरित तोडगा काढून लवकरात – लवकर जमेल त्या स्वरूपात आमदार समीर कुणावर साहेब यांनी मागणी मान्य करावी व प्रश्न मार्गी लावावी, अशी सर्व शेतकऱ्यांनी वायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे.

  अन्यथा शेतक-यांकडून आंदोलन

  प्रशासनाला वारंवार तक्रार देऊन ही येथील पुलाचे बांधकाम न झाल्यामुळे येथील शेतक-यांमध्ये चांगला रोष निर्माण झाला आहे. एखाद्या शेतक-यांचा दुर्देवाने जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का ? असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने येथील समस्या निकाली काढावी, अन्यथा शेतक-यांकडून आंदोलन (Agitation by farmers) करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला आहे.