मुंबई आणि ठाणे परिसरात काळोख! अंबरनाथ बदलापूरमध्ये वाऱ्यासह मुसळधार पाऊस

पुढील 3 ते 4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    ठाणे : आज 13 मे रोजी ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर मुंबईमध्ये सकाळपासून सर्वत्र काळोख पसरला आहे. बदलापूर अंबरनाथ या ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत. त्याचबरोबर काही तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. वातावरणामध्ये थंडावा निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ठाणे, डोंबिवली आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. पुढील 3 ते 4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

    पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3-4 तास अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, आणि धुळ्यात पुढील 3-4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने लावला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग), हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.