anil parab

    मुंबई : शिवसेनेची (Shivsena) ओळख असलेला दसरा मेळावा या वर्षी होणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाजी पार्कवर (Shivaji park) शिंदे गटाकडून (Shinde group) सुद्धा दसरा मेळाव्यावर (Dasara Melava) दावा केला जात आहे, त्यामुळं दोघांनी सुद्धा कोर्टाची (Court) धाव घेतली आहे. दरम्यान, आमची दसरा मेळाव्याची पन्नास वर्षाची परंपरा आहे, त्यामुळं शिवाजी पार्कवर आम्हालाच दसरा मेळावा साजरा करण्यास परवानगी मिळावी अशी याचिका कोर्टात शिवसेनेकडून दाखल करण्यात आली होती. यावर आज निकाल आला आहे.

    दरम्यान, कोर्टाने निकाल देताना, शिंदे गट व शिवसेनेला दोघानाही दसरा मेळाव्यास परवानगी दिली नाहीय, मात्र शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यास शिवसेना ठाम आहे, दसरा मेळावा शिवाजी पार्कवरचं होणार असल्याचं वक्तव्य माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil parab) यांनी केलं आहे, त्यामुळं शिवसेनेनं आता कोर्टाला सुद्धा आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.