ठाकरेंची ताकद वाढली; दत्तात्रय गोर्डेंचा पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश

आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षवाढीस सुरुवात केली आहे. पैठण माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे पुन्हा शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे.

    मुंबई : आगामी निवडणूकीच्या (Lok Sabha Elections 2024) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षवाढीस सुरुवात केली आहे. पैठण माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे (Dattatraya Gorde) पुन्हा शिवसेना (Shivsena) उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी हात शिवबंधन बांधले आहे. या पक्षप्रवेशामुळे (Dattatray Gorde joins Shiv Sena) अजित पवार गटाला (Ajit Pawar) जोरदार धक्का बसला आहे. पैठण विधानसभेच्या निवडणूकीवेळी (Paithan Assembly election) विद्यमान आमदार संदीपान भुमरेंच्या (Sandipan Bhumre) समोर कडे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

    दत्तात्रय गोर्डे हे अजित पवार गटातील नेते होते. यापूर्वी त्यांनी बारावर्षे शिवसेनेसोबत काम देखील केले होते. यानंतर आता पुन्हा एकदा दत्तात्रय गोर्डे यांनी घरवापसी केली असून शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेतील प्रवेशाला पाठिंबा दर्शवत मातोश्री बाहेर गर्दी केली होती. दत्तात्रय गोर्डे यांच्या पक्षप्रवेशामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली आहे.

    दत्तात्रय गोर्डे यांनी 2006 साली पैठण नगरपरिषदेमध्ये शिवसेनेचे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. तसेच 2014 ते 2017 पैठणचे नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. संदीपान भुमरे यांच्याविरोधात विधानसभेची निवडणूक लढवल्यामुळे चर्चेचे कारण बनले होते. त्यावेळी त्यांच्या अवघ्या काही हजार मतांनी पराभव देखील झाला होता. पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना दत्तात्रय गोर्डे संदीपान भुमरेंचा 50 हजार मतांनी पराभव करु असा दावा केला आहे.