दौलत साखर कारखाना सुरू; कामगारांच्या मागण्या मान्य

दीव्यवस्थापन यांच्यात सुरू असलेला संघर्ष आज झालेल्या बैठकीत संपुष्टात आला. शेवटच्या सहाव्या बैठकीत माथाडी कामगार संघटना अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे यांच्याशी बोलणी केली. त्यानंतर आपण वचनबद्ध राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वानुमते कामगारांनी संमती दर्शवली.

  चंदगड : दीव्यवस्थापन यांच्यात सुरू असलेला संघर्ष आज झालेल्या बैठकीत संपुष्टात आला. शेवटच्या सहाव्या बैठकीत माथाडी कामगार संघटना अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंगराव खोराटे यांच्याशी बोलणी केली. त्यानंतर आपण वचनबद्ध राहण्याचे आश्वासन दिल्यानंतर सर्वानुमते कामगारांनी संमती दर्शवली.

  कारखाना गळीत हंगाम सुरू करण्यासाठी शनिवार (दि. १२) पासून शिफ्टनुसार कामावर हजर होण्याचे कामगारांनी मान्य केले. दिवाळी सणाच्या बोनसवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान कामगारांच्या उद्रेकाने हाणामारी आणि दगडफेकीपर्यंत पोहोचले होते. त्यामुळेच ‘अथर्व’ चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी आपल्याला व कामगारांना भविष्यात धोका असल्याने दगडफेक व हाणामारी करणाऱ्या कामगारांवर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. कामगारांनीही अॅट्रॉसिटीसारखे गुन्हे अध्यक्ष व त्यांच्या पुत्रावर दाखल केल्याने दोघांचाही ‘इगो’ दुखावला आणि वाद विकोपाला गेला. गळीत हंगामाच्या पहिल्याच दिवशी दगडफेक आणि हाणामारी झाल्याने हंगाम लांबला. पाच मोठ्या सभा झाल्या.

  एक पाऊल मागे घेण्यास कुणीही तयार नव्हते. ५९ कामगारांना वगळून कारखाना सुरू करणार या खोराटे यांच्या भूमिकेला कामगारांनी तीव्र विरोध केला. आपल्या भूमिकेशी कामगारही ठाम राहिले. अखेर हा वाद  हसन मुश्रीफ यांच्याकडे गेला. ५९ कामगारांना कामावर घेणार, पण त्यातील २० कामगारांना घरी बसवून पगार देणार असल्याचे खोराटे यांनी सांगताच गुरुवार (दि. १०) रोजी कोल्हापूर येथेही झालेली चर्चा निष्फळ ठरली. कारखाना बंद राहिला तर ऊस शेतात राहण्याची भीती उपस्थित होती.

  ७ लाख टनाचे उद्दिष्ट पूर्ण करणार : खोराटे

  गळीत हंगामाला काहीसा उशीर झाला असला तरी ७ लाख टनाचे गाळप करण्यासाठी कामगारांनी प्रयत्नशील राहावे. राग, द्वेष सारे विसरून पुन्हा जोमाने कामाला लागूया, असे आवाहन कंपनीचे अध्यक्ष खोराटे यांनी केले.  शेतकऱ्यांचा वाढता दबाव अलीकडे कामगारांच्यावर आला होता. त्यामुळेच हा वाद २० कामगारांच्यापर्यंत येऊन पोहोचला होता. शेवटी सहाव्या सभेत कामगारांना कामावर घेण्याचे ठरले. यावेळी भरमुआण्णा पाटील, नितीन पाटील, सुभाष जाधव, आबासो चौगुले, प्रदीप पवार यांची भाषणे झाली. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नामदेव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, शांताराम पाटील, अनिल शिवणगेकर, रवी बांदिवडेकर यांच्यासह कामगार उपस्थित होते.

  के.डी.सी बँक आमचीच, हसन मुश्रीफ आमचेच

  के.डी.सी. बँक आमचीच…आणि हसन मुश्रीफ आमचेच आहेत, त्यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन जाऊया. मुश्रीफचं हा प्रश्न सोडवतील असे अनेकांनी सभेत बोलताना सांगितले. कोल्हापूरला झालेल्या चर्चेत अखेर मंत्री हसन मुश्रीफ यांना हा वाद मिटविण्यासाठी अपयश आले.

  माथाडी संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत अखेर यश आले. आणि दौलत साखर कारखान्याची चाके फिरली. अथर्व कंपनीच्या व्यवस्थापनाने, दौलत च्या कामगारांनी सांमज्यस्यांची भुमीका घेऊन कारखाना सुरळीत चालवून शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन काम करावे, असे माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी सांगितले.