daulatabad fort

औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादच्या किल्ल्याचे (Daulatabad Fort) नाव अधिकृतरीत्या देवगिरी किल्ला (Devagiri Fort) करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दाखल केला जाणार आहे.

    औरंगाबाद : शिंदे सरकार आणखी एक नामांतराचा निर्णय घेणार आहे. कारण औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादच्या किल्ल्याचे (Daulatabad Fort) नाव अधिकृतरीत्या देवगिरी किल्ला (Devagiri Fort) करण्याचा प्रस्ताव सरकारकडे दाखल केला जाणार आहे. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी याविषयी माहिती दिली आहे. लोढा सध्या औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. दौलताबाद किल्ल्यावर त्यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे.

    यावेळी लोढा म्हणाले की, हा पूर्वी देवगिरी किल्ला होता. आतादेखील तो देवगिरी किल्लाच आहे. मात्र काही लोक याला दौलताबाद किल्ला म्हणून ओळखतात. त्यामुळे या किल्ल्याचे नाव आता परत देवगिरी किल्ला करावे असा ठराव सरकारकडे आम्ही ठेवणार आहोत, असे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले. तसेच यापुढे आता दरवर्षी या किल्ल्यावर १७ सप्टेंबरला भारत माता मंदिर येथे ध्वजारोहण कार्यक्रम पार पडेल. तर पर्यटन विभाग आणि इतर प्रशासकीय विभागाच्यावतीने मोठा कार्यक्रम दरवर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे.

    औरंगाबादपासून सुमारे १५ किलोमीटरवर दौलताबाद गावाजवळ हा किल्ला आहे. या किल्ल्याचा डोंगर ६०० फूट उंच आहे. किल्ल्याच्या भोवती ५० फूट रुंदीचा खोल पाण्याने भरलेला खंदक आहेत.