कातरखटाव येथे दिवसाढवळ्या दरोडा; लाखोंच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

कातरखटाव (ता. खटाव) येथे घरात कोणी नसल्याचे पाहून चोरटयांनी रोख रखमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कातरखटाव येथे तानाजी देशमुख यांचे केशव मेडिकल नावाचे औषधाचे दुकान आहे. दुकानापासून शंभर मीटरच्या अंतरावर त्यांचे राहते घर आहे. घराच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे.

    वडूज : कातरखटाव (ता. खटाव) येथे घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी रोख रखमेसह सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कातरखटाव येथे तानाजी देशमुख यांचे केशव मेडिकल नावाचे औषधाचे दुकान आहे. दुकानापासून शंभर मीटरच्या अंतरावर त्यांचे राहते घर आहे. घराच्या आजूबाजूला लोकवस्ती आहे.

    देशमुख व व त्यांच्या पत्नी घराला लॉक करुन दुकानात गेले होते. त्यांचा मुलगाही काही कामानिमित्त बाहेर गेला होता. घरासमोर त्यांचे कुत्रे बांधले होते. घरासमोर विठ्ठल मंदिर आहे. मंदिराच्या परिसरातून लक्ष ठेवून व घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी मांसामध्ये गुंगीचे औषध टाकून कुत्र्याला खायला दिले. कुत्रा निपचित पडल्यावर चोरट्यांनी घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरामधील कपाट, भांडी, संडास-बाथरुमवरील घमेली सर्वकाही तपासून घरातील सर्व सोन्याचे दागीने चोरुन नेले.

    देशमुख काही कामनिमित्त घरी आले तेव्हा त्यांना घराचे दरवाजाचे लॉक तोडलेले दिसले. त्यांना घरामध्ये चोरी झाल्याचा संशय आला. भरदिवसा भरलोकवस्तीत चोरी झाल्याने कातरखटाव आणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांसमोर मात्र या गुन्ह्याच्या तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.