अजित पवारांची मंत्र्यांना सक्त ताकीद; म्हणाले, ‘मनोज जरांगे पाटलांवर कोणीही प्रतिक्रिया देऊ नका’

राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा (Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्याची अधिसूचना राज्य सरकारने (State Govt) काढली. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या गटातील आमदारांना खास सूचना दिल्या आहेत.

    मुंबई : राज्यामध्ये सध्या आरक्षणाचा (Reservation) मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजातील (Maratha) कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र (Kunbi certificate) देण्याची अधिसूचना राज्य सरकारने (State Govt) काढली. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईच्या दिशेने विराट मोर्चा घेऊन गेल्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. या निर्णयावरुन राज्यमध्ये गोंधळ निर्माण झाला असून महायुती सरकारने सुवर्णमध्य काढल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी दिली. मात्र या सगळ्यानंतर देखील आरक्षणाचा गोंधळ असूनही समाजमनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (DCM Ajit Pawar) आपल्या गटातील आमदारांना खास सूचना दिल्या आहेत.

    मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरु असताना अजित पवार गटाचे नेते व मंत्री छगन भुजवळ यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी एल्गार सभा घेत जरांगे पाटील यांच्यावर खरपूस टीका केली. यानंतर अजित पवार यांनी देखील मुंबईतील मोर्चापूर्वी जरांगे पाटील यांना कायद्यापेक्षा मोठा कोणी नाही अशा शब्दांत इशारा दिला होता. यानंतर आता अजित पवारांनी सावध भूमिका घेत कार्यकर्ते व नेत्यांनी सूचना दिल्या आहेत. ‘मनोज जरांगे पाटलांवर कोणीही प्रतिक्रिया देऊ नका’, अशा सूचना अजित पवार यांनी त्यांच्या मंत्र्यांना दिल्या आहेत.

    मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजातील आरक्षणावर राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध दर्शवला. ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याची भूमिका घेत भुजबळ यांनी सभा घेत जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता. यामुळे अजित पवार गटातील नेते मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना या खास सूचना दिल्या आहेत.