मंदिर उद्घाटन सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी गायले प्रभू श्री रामांचे गाणे’; व्हिडिओ तुफान व्हायरल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये श्री राम गीत गायले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

    नागपूर : उद्या राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा अयोध्येमध्ये (Ayodhya) पार पडणार आहे. यामुळे देशभरामध्ये उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी नागपूरमध्ये (Nagpur) श्री राम गीत (Shree Ram Song) गायले आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

    नागपूरमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळ्यामुळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बडकस चौक याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये फडणवीस यांनी राम मंदिर लढ्याच्या वेळी लोकप्रिय असलेले श्री राम गीत गायले. हिंदू जाग गया है, मंदिर बन गया है और ध्वज अब मंदिर पर लहराने लगा है असे गाणे फडणवीस यांनी गायले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ही ऊर्जा आणि नजारा फक्त भगवान श्री रामच आणू शकतात! आणखी एक दिवस…’ अशा शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

    देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील राम मंदिर लढ्यातील अनेक क्षण शेअर केले आहेत. यावरुन आता राजकारण रंगताना दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर जहरी टीका करत त्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. फडणवीसांनी नागपूर येथील राम मंदिर आंदोलनावेळीचा फोटो शेअर केल्यानंतर देखील तुम्ही नागपूर स्टेशनच्या बाहेर तरी गेले होते का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला.