मुंबईत महिलेची हत्या, मेट्रोच्या बांधकाम साईटजवळ सुटकेसमध्ये आढळला महिलेचा मृतदेह!

मुंबई मेट्रोच्या बांधकाम साईटजवळ एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. फॉरेन्सिक तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटणार आहे.

    मुंबईत मेट्रोच्या बांधकामाजवळ एका सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने (Dead Body Found In Suitcase) खळबळ उडाली आहे. मुंबईतील शांती नगर परिसरातील सीएसटी रोडवरील मेट्रो बांधकाम साइटजवळ एका बॅरिकेडजवळ एका सुटकेस पडून होती. त्यामध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    महिलेने टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातला होती

    मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एका सोडलेल्या सुटकेसबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे सुटकेस जप्त केली. मेट्रोच्या ठिकाणी ती जप्त करण्यात आली.” अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि एका सूटकेसमधून एका महिलेचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी नागरी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

    फॉरेन्सिक तपासणीनंतर पटणार मृतदेहाची ओळख

    मृत महिलेची ओळख अद्याप समोर आलेली नाही. प्राथमिक अहवालानुसार महिलेचे वय 25 ते 35 वर्षांच्या दरम्यान असू शकते, मात्र फॉरेन्सिक तपासणीनंतरच तिची नेमकी ओळख स्पष्ट होईल.