पान टपरीवर जातो म्हणून गेलेले ‘ते’ अखेर परतले नाहीच; थेट विहिरीतच आढळला मृतदेह

गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या एसटी बस चालकाचा आगार परिसरातील विहिरीत मृतदेह (Deadbody Found in Well) आढळून आला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.

    पांढरकवडा : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या एसटी बस चालकाचा आगार परिसरातील विहिरीत मृतदेह (Deadbody Found in Well) आढळून आला. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. गोंविद कवासे (वय 45, रा. शिवाजी वॉर्ड, पांढरकवडा) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

    4 डिसेंबर रोजी रात्री ते पानठेल्यावर जाऊन येतो, असे पत्नीला सांगून गेले होते. परंतु, ते परत आले नाही. गुरुवारी सकाळच्या सुमारास बसस्थानक आगार परिसरातील विहिरीमध्ये त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याप्रकरणी मृतकाची पत्नी अश्विनीने पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार, ते चालक पदावर कार्यरत होते आणि त्यांना दारू पिण्याची सवय होती. त्यामुळे त्यांची मनस्थिती बिघडत होती.

    आनंदराव पानठेल्यावर गेले. ते परत न आल्याने शेवटी त्यांच्या मोबाईलवर कॉल केला असता त्यांचा मोबाइल बंद आला. दुसऱ्या दिवशी 9 वाजता सासरे घरी आले आणि त्यांनी आनंदरावचा मृतदेह आगारातील विहिरीत तरंगत असल्याचे सांगितले.