विरार पेट्रोल पंपावर कुत्र्याला वाचवणाऱ्या प्राणीमित्रावर प्राणघातक हल्ला, कारवाई करण्यास पोलीसांची टाळाटाळ

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्न करणा-या तरुण प्राणीमात्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना विरारच्या पेट्रोल पंपावर घडली असून,पोलीसांनी मात्र,कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यामुळे नागरिकांना संताप व्यक्त केला आहे.

    वसई । रविंद्र माने:- एका कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या तरुण प्राणीमित्रावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना विरारच्या पेट्रोल पंपावर घडली असून,पोलीसांनी मात्र,कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यामुळे नागरिकांना संताप व्यक्त केला आहे. प्राणीमित्रावर आणि हल्ला झालेल्या तरुणाच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार,कौस्तुभ जाधव हा रात्री नऊ वाजताच्या सुमारास विरार पुर्व-चंदनसार येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता.त्यावेळी पंपावरील कर्मचारी एका कुत्र्याला गोणीत भरून मारहाण करीत असल्याचे त्याला दिसले.त्यामुळे त्या कुत्र्याचे प्राण वाचवण्याचा कौस्तुभने प्रयत्न केला आणि कुत्र्याला मारहाण करतानाचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमधून काढण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी पंपावरी तीन कर्मचा-यांनी त्याला लोखंडी राॅड आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

    या हल्ल्यामध्ये कौस्तुभ बेशुध्द पडला आणि त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या.ही बाब समजल्यावर प्राणीमित्र आणि त्याच्या पालकांनी कौस्तुभला उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले.त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून,अंतर्गत रक्तस्त्रावही झाल्याचे पालकांनी सांगितले.तर कौस्तुभने हल्लेखोरांची नावे सांगितल्यानंतरही विरार पोलीसांनी दखल न घेता गंभीर कलमे न लावता हल्लेखोर अनोळखी असा उल्लेख केला.या पंपावर नेहमीच मारहाणीच्या घटना घडत असतात,मात्र पोलीस त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप कौस्तुभच्या आईने केला आहे.

    कौस्तुभला लहानपणापासून प्राण्यांचे वेड आहे.पेट्रोल पंपावरील कर्मचारी कुत्र्याला गोणीत घालून मारहाण करीत असल्याचे त्याला दिसून आले,त्यामुळे त्याने कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे.या हल्ल्यात त्याच्या डोक्याला टाके घालण्यात आले आहेत.पोलीसांनी मात्र कोणतीही गंभीर दखल घेत नसल्याचा आरोप त्याचे वडील हेमंत जाधव यांनी केला आहे.मुक्या प्राण्याला मारहाण करण्याला मज्जाव करण्याच्या प्रयत्नात कौस्तुभवर झालेल्या हल्ल्याचा प्राणीमित्र ,सर्पमित्र संघटनेने तीव्र निषेध केला आहे.