डेंग्यू आजाराने बारामतीतील महिला पोलिस कर्मचऱ्याचा मृत्यू

बारामती शहर पोलीस ठाण्यातील शीतल जगताप गलांडे या महिला पोलीस कर्मचऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. १० दिवसापूर्वी त्या प्रसूती होऊन त्यांना मुलगा झाला होता, यानंतर डेंग्यूने त्यांचा बळी गेल्याने १० दिवसाचे बालक , एक मुलगी पोरकी झाली आहे.

    बारामती : बारामती शहर पोलीस (Baramati police station)ठाण्यातील शीतल जगताप गलांडे या महिला पोलीस कर्मचऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. १० दिवसापूर्वी त्या प्रसूती होऊन त्यांना मुलगा झाला होता, यानंतर डेंग्यूने (Dengue) त्यांचा बळी गेल्याने १० दिवसाचे बालक , एक मुलगी पोरकी झाली आहे.

    शीतल जगताप यांना डेंग्यूची लागण झाल्याने यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या रक्तातील पेशींचे प्रमाण कमी चालले होते. त्यात त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. आज (दि २०) पहाटे तीन वाजता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शीतल या त्या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली.

    शितल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या .पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या.पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

    त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे.शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी आज पणदरे(ता. बारामती) याठिकाणी होणार आहे. दरम्यान शीतल यांच्या या दुर्दैवी मृत्यूने पोलिस दलासह बारामती शहर व परिसरात खळबळ उडाली आहे .