अकोटमध्ये एसटी कामगाराचा मृत्यू ; आंदोलनाचा धसका घेतल्यानं तब्येत खालावली

    अकोट (Akot) : आगारात वाहक असलेले 43 वर्षीय संतोष रजाने यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. आंदोलनाचा धसका घेतल्यानं संतोष रजाने तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे.

    गेल्या 15 दिवसांपासून वाहक संतोष रजाने यांची तब्बेत खालावली होती. संतोष रजाने यांनी आंदोलनाचा धसका घेतल्यानं तब्बेत खालावली होती. दुर्दैवाने संतोष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. st कर्मचाऱ्यांनी संतोषच्या मृत्यूसाठी शासनाला दोषी ठरवत शोक व्यक्त केला.