electricity shock

आळते (ता. हातकणंगले) येथील पत्रावळी कारखान्यात विजेचा शॉक (Electric Shock) लागून दीपक राजेंद्र गौतम (वय 30, रा. मिरजापूर, उत्तर प्रदेश) हा कामगार ठार झाला. ही घटना ग्रिनवेल इको प्रोडक्ट प्रा. लिमिटेड या पत्रावळ्या तयार करण्याच्या कारखान्यात घडली. 

    हातकणंगले : आळते (ता. हातकणंगले) येथील पत्रावळी कारखान्यात विजेचा शॉक (Electric Shock) लागून दीपक राजेंद्र गौतम (वय 30, रा. मिरजापूर, उत्तर प्रदेश) हा कामगार ठार झाला. ही घटना ग्रिनवेल इको प्रोडक्ट प्रा. लिमिटेड या पत्रावळ्या तयार करण्याच्या कारखान्यात घडली.

    आळते (ता .हातकणंगले) येथील रामलिंग रोडलगत असलेल्या पत्रावळ्या बनविण्याच्या कंपनीत तीन शिप्टमध्ये कामगार काम करतात. यामध्ये स्थानिक महिला कामगारांची संख्या मोठी असताना व्यवस्थापणाने परप्रांतीय कामगारांनाही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमले आहे. दोन महिन्यांपूर्वी दीपक या कारखान्यात कामासाठी आला होता. रविवारी सायंकाळी दीपक गौतम साचाच्या जाळ्या पाण्याने स्वच्छ करत होता. पाण्याच्या हौदात विजेचा प्रवाह उतरला.

    दीपक गौतमला जोराचा शॉक लागून तो फेकल्याने डोक्यावर जोरात आपटला. त्यात त्याच्या डोक्याला जोराचा मार लागला. त्याला इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.