nitin gadkari death threat

नागपुरात (Nagpur) खामला परिसरात नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) कार्यालय आहे. त्या कार्यालायत शनिवारी सकाळपासून धमकीचे ३ फोन आल्याची माहिती आहे. दुपारी १२ च्या सुमारास हे तिन्ही फोन आल्याची माहिती आहे. फोनवर असलेल्या इसमानं नितीन गडकरींकडे खंडणीची मागणी केली आहे.

    नागपूर: पुलकरी अशी ओळख असलेले आणि विकासाच्या कामात देशात ज्यांचं नाव अग्रक्रमान घेतलं जात, अशा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आल्याची माहिती आहे. गडकरींच्या नागपूरच्या (Nagpur) कार्यालायत अंडरलवर्ल्ड डॉन दाऊद (Dawood) इब्राहिमच्या नावे धमकी देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. यानंतर नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाची आणि कार्यालयाची सुरक्षा वाढण्यात आली आहे. फोनवरुन धमकी देण्याने गडकरींकडे खंडणीही मागितल्याचं सांगण्यात येतय. नितीन गडकरी सध्या नागपुरातच आहेत. त्यांच्या सुरक्षेकडे यंत्रणांचं बारीक लक्ष असल्याची माहिती आहे.

    तीन वेळा धमकीचे फोन
    नागपुरात खामला परिसरात नितीन गडकरींचे कार्यालय आहे. त्या कार्यालायत शनिवारी सकाळपासून धमकीचे ३ फोन आल्याची माहिती आहे. दुपारी १२ च्या सुमारास हे तिन्ही फोन आल्याची माहिती आहे. फोनवर असलेल्या इसमानं नितीन गडकरींकडे खंडणीची मागणी केली आहे. खंडणीची रक्कम मिळाली नाही तर गडकरींना जीवे मारण्यात येईल, अशी धमकी फोनवरुन देण्यात आलीये. आता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा आता शोध घेण्यात येतो आहे.

    कर्नाटकातून फोन आल्याची माहिती
    गडकरींना आलेल्या या धमकीच्या फोननंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. एटीएसच्या टीम, सायबर सेलचे अधिकारी गडकरींच्या कार्यालयात पोहचले आहेत. वेगाने या फोनचा शोध घेण्यात आला असून, हा फोन कर्नाटकातून आल्याचं सांगण्यात येतंय. कर्नाटकात संपर्क साधून या व्यक्तीला अटक करण्याच्या तयारीत पोलीस आता आहेत.