
सोमवारी, 30 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांना पुन्हा एक मेल आला ज्यामध्ये 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती
दोन तीन दिवसापुर्वी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक अब्जाधीश मुकेश अंबानी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा, धमकी पाठवणाऱ्याने दिला आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. ३१ ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान दोन धमकीचे ईमेल आल्याची माहिती समोर आली आहे.
आठवडाभरात चौथी धमकी
सोमवार, 30 ऑक्टोबर 2023 रोजी मुकेश अंबानी यांना पुन्हा धमकी देणारा आणि या रकमेची मागणी करणारा एक मेल आला. याआधी त्यांना सलग दोनदा अशाच धमक्या आल्या होत्या, मात्र त्यानंतर कमी रकमेची मागणी करण्यात आली होती. सोमवारी, 30 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांना पुन्हा एक मेल आला ज्यामध्ये 400 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. याआधीही मुकेश अंबानींना याच मेल आयडीवरून दोनदा धमक्या आल्या होत्या आणि दोन्ही वेळा खंडणीची मागणी करण्यात आली होती. पहिली खंडणी 27 ऑक्टोबर रोजी मेलद्वारे मागितली गेली होती आणि 20 कोटी रुपयांची मागणी होती, तर दुसरा खंडणीचा मेल 28 ऑक्टोबरला आला होता, ज्यामध्ये खंडणीची रक्कम 200 कोटी रुपये करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांना धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे.
यापुर्वीही घडलायं असाच प्रकार
मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी बिहारमधील दरभंगा येथून एका व्यक्तीला अटक केली होती. आरोपींनी मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल बॉम्बने उडवून देण्याची धमकीही दिली होती.