मोठी बातमी! प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीना जीवे मारण्याची धमकी, 20 कोटींची मागणी

उद्योगपती मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना धमकीचा ईमेल आला असून त्यात 20 कोटींची मागणीही करण्यात आली आहे.

    मुंबई :  मुंबईतुन एक मोठी बातमी समोर येत आहे. उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat to Mukesh Ambani) देण्यात आली आहे. मुकेश अंबानी यांना धमकीचा ईमेल आल्याची माहिती आहे. यामध्ये धमकी देणाऱ्या व्यक्तीनं मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शादाब खान नावाच्या व्यक्तीने 27 ऑक्टोबरला ही धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी धमकीची माहिती दिल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली आहे.

    मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी बिहारमधील एका व्यक्तीला मुंकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लक्ष्य करून धमकीचे कॉल केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. फोन करणाऱ्याने दक्षिण मुंबईतील अंबानी कुटुंबाचे निवासस्थान ‘अँटिलिया’ तसेच एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलला “उडवण्याची” धमकी दिली होती.