संजय राऊतांना फोनवर जीवे मारण्याची धमकी

शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

    शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरून सत्ताधाऱ्यांवर विरोधाची तोफ डागळत आहे. अशातच संजय राऊत यांना बुधवारी दिवसभरात दोन फोन असल्याने एकाच खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून समोर येत आहे. हे धमकीचे फोन कन्नड रक्षण वेदिका (Kannada Rakshana Vedika) संघटनेकडून आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

    शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शंभूराज यांनी राऊतांवर हल्लाबोल केला. राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून टीका केली होती. हे सरकार नामर्द असल्याचं राऊतांनी म्हटलं होतं. यानंतर राऊतांनी आपलं तोंड आवरावं, असा इशारा शंभूराज देसाई यांनी दिला.

    संजय राऊतांना सीमावादावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणं थांबवावं, नाहीतर त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असं शंभूराजे यांनी म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.