Police have arrested two persons in connection with the attack on Shiv Sena's city liaison chief Prasad Sawant

रविवारी प्रसाद सावंत यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या इसमाने थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तुझी नेतेगिरी माथेरानमध्येच कर, कर्जतमध्ये आला तर मागच्या वेळी फक्त मारहाण करून सोडलं, पण यावेळी जीवे मारू, अशी थेट धमकी दिली.

    मुंबई : महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळल्यानंतर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर बंडखोर आमदार आणि खासदारांनी केलेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत (Shivsena) अंतर्गत संघर्ष धुमसत आहे. शिवसैनिक आणि बंडखोर गटाचे समर्थक यांच्यात वाद होत असून काल माथेरानचे (Matheran) शिवसेना नेते प्रसाद सावंत (Prasad Sawant) यांना जीवे मारण्याच्या धमकीचा (Death Threats) फोन आल्याने खळबळ उडाली आहे.

    माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत यांना अज्ञाताने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सावंत यांना रविवारी फोनवरून ही धमकी देण्यात आली असून त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी कर्जतमध्ये हल्लाही करण्यात आला होता. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर माथेरानचे शिवसेना नेते प्रसाद सावंत हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिले. तसेच, कर्जतचे बंडखोर शिवसेना आमदार महेंद्र थोरवे (Mla Mahendra Thorve) यांचा फोटोही त्यांनी माथेरानच्या शिवसेना शाखेतून काढला होता.

    दुसऱ्याच दिवशी सावंत हे कर्जतला गेले असताना अज्ञातांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. यातून ते थोडक्यात वाचले. या हल्ल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल करण्यात आला असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांची भेटही घेतली होती. दरम्यान, हल्ल्यातील जवळपास आरोपी हे अजूनही फरार आहेत.

    रविवारी प्रसाद सावंत यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. फोन करणाऱ्या इसमाने थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तुझी नेतेगिरी माथेरानमध्येच कर, कर्जतमध्ये आला तर मागच्या वेळी फक्त मारहाण करून सोडलं, पण यावेळी जीवे मारू, अशी थेट धमकी दिली. याप्रकरणी प्रसाद सावंत यांनी माथेरान पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञाताविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.