नव्या पेहरावात डेक्कन क्वीन, नवीन एलएचबी आकर्षक कोच प्रवाशांना खुणावतायेत

    मुंबई : डेक्कन क्वीन (Deccan Queen Railway) दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी सादर करण्यात आलेली पहिली डिलक्स ट्रेनला पुण्याचे (Pune) नाव देण्यात आले. आजपासून या डेक्कन क्वीनला नवीन आकर्षक, सुंदर एलएचबी कोच, एलएचबी व्हिस्टाडोम कोच आणि एलएचबी डायनिंग कारसह नवीन पेहरावात व नवीन सजावटीत रवाना झाली.  (Deccan Queen New LHB Coaches) एलएचबी डब्यांसह डेक्कन क्वीनची धाव ही बहुप्रतिक्षित होती. जी आज आनंदी व उत्साही प्रवासी आणि रेल्वे चाहत्यांच्या टाळ्यांसह पूर्ण झाली. या गाडीचे सर्व प्रवाशांनी जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत केले. (Deccan Queen train Passenger wel come)

    दरम्यान, डेक्कन क्वीनच्या (Deccan Queen Railway) “योग्य वेळेत सुटणे” आणि “आगमन” च्या निर्दोष रेकॉर्डमुळे दोन्ही शहरांतील जनता आनंदी आहे. गेल्या ९२ वर्षांच्या रंगीबेरंगी इतिहासात, ही ट्रेन मुंबई आणि पुणे (Mumbai and Pune) या दोन शहरांमधील वाहतुकीच्या केवळ माध्यम म्हणून सुरु झाल्यापासून एक संस्था म्हणून विकसित झाली आहे. ज्याने अत्यंत निष्ठावान प्रवाशांची पिढी बांधली आहे. त्यामुळं या डेक्कन क्वीन गाडीला अनेक प्रवाशी पसंती देतात. आज नव्या रुपात नव्या सजावटीसह ही गाडी पुण्याला रवाना झाली.