fraud

सायबर पोलिसांनी सापळा (Cyber Police) रचून नायझेरियन ठगबाजांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. कारवाई दरम्यान आरोपींकडून पोलिसांवर हल्ला करण्यासह पळून जाण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

    नागपूर : सायबर पोलिसांनी सापळा (Cyber Police) रचून नायझेरियन ठगबाजांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. कारवाई दरम्यान आरोपींकडून पोलिसांवर हल्ला करण्यासह पळून जाण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पण, असा प्रकार घडण्याची शंका असल्याने पोलिस पूर्वीच सतर्क होते. त्यांनी समयसूचकता दाखवित आरोपींना पकडले.

    या नायझेरीन टोळीने ऑर्गेनिक पावरडच्या नावाखाली औषधी विक्रेत्याची फसवणूक केली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण प्रकरणासह कारवाईबाबत विस्तृत माहिती दिली.

    चिनोन्सो हा पाच वर्षांपूर्वी भारतात आला. त्याने येथील एका मुलीशी लग्न केले. त्याला एक मुलगीसुध्दा आहे. तो कपड्याच्या व्यवसाय करायचा. नंतर तो सायबर गुन्हेगारीकडे वळला. या गुन्ह्यात त्याने पत्नीलाही जोडले. फसवणुकीची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात जमा करण्यासाठी त्याने इतर आरोपींना पैशाचे आमिष दाखविले.

    चिनोन्सो आणि त्याची पत्नी वैशाली ऊर्फ स्टेफी हे दोघेही लोकांना फसवित होते तर लक्ष्मण, शकील आणि बबलु कुमार हे तिघे बँक खाते उघडून त्यात फसवणुकीची रक्कम जमा करत होते. तांत्रिक तपासाच्या आधारे चिनोन्सो याचे लोकेशन घेतले आणि आरोपीला अटक केली.

    चिनोन्सो टोळीचा सूत्रधार

    चिनोन्सो न्वाकोहो राफेल (37) रा. नायझेरीया ह.मु. ठाणे, लक्ष्मण बागवे, शकील अहमद दोन्ही रा. ठाणे आणि बबलुकुमार शर्मा, रा. इंदोर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. चिनोन्सो हा टोळीचा सूत्रधार आहे. पोलिसांनी त्याचे बँक खाते गोठविले असून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्या नायझेरीयातील बँकेत जवळपास 9 लाख रुपये आहेत. ती रक्कम परत मिळविण्यासाठी सायबर पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.