आजरा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा; सामाजिक कार्यकर्त्याची मागणी

चालू वर्षी अनियमित पाऊस पडल्याने दुबार पेरण्या कराव्या लागल्या होत्या. मात्र, त्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात वाया गेल्या आहेत. मिरची, नाचणी, भात, तरवा जागेवर कुजला. तसेच सोयाबीन, भुईमूग पिकांची वाढ देखील खुंटली आहे.

    उत्तूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : चालू वर्षी अनियमित पाऊस पडल्याने दुबार पेरण्या कराव्या लागल्या होत्या. मात्र, त्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात वाया गेल्या आहेत. मिरची, नाचणी, भात, तरवा जागेवर कुजला. तसेच सोयाबीन, भुईमूग पिकांची वाढ देखील खुंटली आहे. त्यामुळे आजरा तालुक्यातील शेतीचा पंचनामा करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी आर्दाळ (ता.आजरा) येथील सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गुरव यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनातून केला आहे.

    शेतकऱ्यांना सरासरीपेक्षा पन्नास टक्के कमी उत्पादन मिळेल; काही शेतकऱ्यांना याहीपेक्षा कमी उत्पन्न मिळेल. शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे फोटो यामध्ये न गुंतता सरासरी एकरी किमान दहा हजार रुपये सरासरी नुकसान भरपाई मिळावी. शेतकऱ्यांना मशागत, बी-बियाणे, खते व मजुरी या खर्चाचा हिशेब केला असता एकरी किमान दहा हजार रुपये खर्च केला आहे.

    किमान तो खर्च म्हणून सरासरी सर्व शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा शासनाने विचार करावा. असा विचार प्रशासन करेल, अशी आशा आहे. कृपया विचार व्हावा व शेतकऱ्यांना जगण्याचे साधन म्हणून पिक नुकसानभरपाई अशी मागणी केली आहे.