Declare wet drought in Chikhaldara taluk - Congress workers' statement to Tehsildar

केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशांमध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेल्या जीएसटीमुळे (GST) सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

    चिखलदरा : केंद्रातील मोदी सरकारच्या (Modi Govt) विरोधात चिखलदरा काँग्रेस (Chikhaldara Congress) आक्रमक झाली आहे. चिखलदरा तहसीलसमोर केंद्रातील सरकारच्या विरोधात घोषणाबाजी (Sloganism) करण्यात आली. याबरोबरच अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त (Amravati district drought affected) असल्याने दुष्काळ जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन चिखलदरा तहसीलदारांना देण्यात आले.

    महागाई विरोधात संताप

    केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशांमध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूंवर वाढलेल्या जीएसटीमुळे (GST) सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाईघाईत चालू केलेल्या भारतीय सैन्य दलातील अग्निपथ योजनांमुळे (Agneepath Schemes) देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे. देशांमध्ये बेरोजगारी (Unemployment) वाढत आहे. त्यामुळे केंद्र शासनाविरोधात तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहरच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

    नुकसानीचे पंचनामे करीत मदत द्या

    जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचा घरांमध्ये व प्राण्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मात्र अद्यापही नुकसानीचे पंचनामे करीत नुकसान भरपाई देण्याची कारवाई झालेली नाही. त्यामुळे तात्काळ सर्वेक्षण करून नुकसान झालेल्या शेतकरी नागरिक व पशुपालकांना सरसकट मदत द्यावी. जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे.

    नदी नाल्यांचे प्रवाह बदलल्यामुळे शेतात पाणी घुसून जमीन खरडून निघाली आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचे संकट कोसळले आहे. आदी विविध मागण्यांचे निवेदन चिखलदरा काँग्रेस कमिटी (Chikhaldara Congress Committee) तर्फे देण्यात आले. निवेदन देतेवेळी सहदेव बेलकर, दयाराम काळे, राहुल येवले, उर्मिला झारखंडे, रजनी बेलसरे, किशोर झारखंडे, अमित बेलकर, मिलिंद शेमरे, राकेश झारखंडे, रामप्रसाद पंडोले यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.