टोमॅटोच्या बाजारभावात घसरण; शासनाच्या आयातीच्या निर्णयाने उत्पादकांमध्ये संताप

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला (Vegetable Prices) आवारात 20 किलोंच्या कॅरेट्ला 2300 रुपये ते 2500 रुपये इतका बाजारभाव टोमॅटोला (Tomato Prices) मिळत आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर किलोला दोनशे रुपयांपर्यंत गेल्यामुळे ग्राहकाला दिलासा देण्यासाठी नेपाळ येथून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

    लासलगाव : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला (Vegitable Prices) आवारात 20 किलोंच्या कॅरेट्ला 2300 रुपये ते 2500 रुपये इतका बाजारभाव टोमॅटोला (Tomato Prices) मिळत आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर किलोला दोनशे रुपयांपर्यंत गेल्यामुळे ग्राहकाला दिलासा देण्यासाठी नेपाळ येथून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

    पंजाब, कर्नाटक राज्यांसह नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या आवकेत वाढ झाली आहे. 20 ते 25 हजार टोमॅटोचे क्रेट्स येण्यास सुरुवात झाल्याने टोमॅटोच्या बाजारभावात सोमवारच्या तुलनेत आज 50 टक्क्यांहून अधिक दर घसरले. त्यामुळे टोमॅटोच्या 20 किलोंच्या कॅरेट्ला जास्तीत जास्त 1100 रुपये कमीत कमी 200 रुपये तर सरासरी 901 रुपयांपर्यंत दर खाली आल्याने आणखीन दर घसरण्याच्या भीतीमुळे टोमॅटो टकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    गेल्या चार ते पाच वर्षानंतर टोमॅटोच्या बाजारभावाची तेजी निर्माण झाल्याने कुठेतरी टोमॅटो उत्पादकांना ‘अच्छे दिन’ आले असताना नेपाळमधून टोमॅटो आयात करण्याचा निर्णयामुळे टोमॅटो मातीमोल दराने विकण्याची वेळ येण्याची भीती आहे. ही वेळ टोमॅटो उत्पादकांवर येऊ नये. यासाठी केंद्र सरकारने नाफेडमार्फत टोमॅटो खरेदी करत ग्राहकाला फुकट वाटावेत, तसेच जास्तीत जास्त टोमॅटो देशाबाहेर निर्यात करण्यासाठी पुढाकार घ्यावा.

    – शिवा सुरासे, शेतकरी, टाकळी (विचूर)