शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार वाढ, दीपक केसरकर घेणार निर्णय

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी म्हटले आहे.

    मुंबई : राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना योग्य मानधन ( honorarium to education servants) मिळत नाही. अत्यंत कमी मानधन असल्याने कुटुंब चालवणे कठीण आहे.(Monsoon Session) याबाबत विधानसभेत आमदार सुधीर तांबे, वाजहत मिरझा, बाळाराम पाटील, निरंजन डावखरे, विक्रम काळे, रमेश पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला.

    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ६ हजारपेक्षा कमी मानधन आहे. त्यामुळे परवड होते. शिक्षकांनाही अत्यंत कमी पगार आहे. डीएड शिक्षकांना ६ हजार, महाविद्यालयाच्या शिक्षकांना १० हजार वेतन आहे. यावेळी, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उत्तर दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी दिले.