काल वाद, आज दिलजमाई, राणेंबाबत पहा नेमकं काय म्हणाले दीपक केसरकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंसोबत काम करण्याची वेळ आली तर तयार आहे. नारायण राणेंसोबत एका मुद्द्यावर वाद झाले होते. पण, आता आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. जेव्हा आमची भेट होते, तेव्हा आदराने वागतो. माझ्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ नारायण राणेंशी जोडणे चुकीचे आहे. त्यामुळे यापुढे पत्रकार परिषदेत मी राणेंचे नाव घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  मुंबई : मी आयुष्यात काही तत्व पाळतो. त्यामध्ये मी पवारांचे (Sharad Pawar) नाव कधी घेतले नाही. माझा आणि राणेंचा वाद (Deepak Kesarkar And Narayan Rane Dispute) जगाने पाहिला आहे. त्यामुळे मी यापुढे राणे (Narayan Rane) यांचे नाव पत्रकार परिषदेत (Press Conferance) घेणार नाही, अशी नरमाईची भूमिका शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी घेतली आहे.

  दीपक केसरकर यांनी काल पत्रकार परिषदेत शिवसेना भाजप युती (Shivsena BJP Alliance) राणे यांच्यामुळे झाली नाही. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत चर्चा सुरु होती. परंतु, नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतल्यामुळे ठाकरे नाराज झाले आणि युतीच्या चर्चा बंद झाल्या असे केसरकर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपने नाराजी व्यक्त केल्यानंतर केसरकर यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंसोबत काम करण्याची वेळ आली तर तयार आहे. नारायण राणेंसोबत एका मुद्द्यावर वाद झाले होते. पण, आता आमच्यामध्ये कोणताही वाद नाही. जेव्हा आमची भेट होते, तेव्हा आदराने वागतो. माझ्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ नारायण राणेंशी जोडणे चुकीचे आहे. त्यामुळे यापुढे पत्रकार परिषदेत मी राणेंचे नाव घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

  पेपर नॅपकीन वापरुन फेकावा असे आदित्य यांचे विधान

  अनेक शिवसैनिकांचे मला उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणा असे फोन येतात. तसे प्रयत्न मी केले. जेवढा पुढाकार घ्यायचा तेवढा घेतला. मात्र, आदित्य ठाकरे यांचे कालचे विधान पेपर नॅपकीन वापरुन फेकावा असे होते, असा टोला त्यांनी लगावला.

  तुम्ही जमिनीवर या

  राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत तुम्हाला प्रेम असेल तर तो तुमचा प्रश्न आहे. भाजपाने महापालिकेत शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तुम्ही स्वप्नात वावरत आहात. अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही जमिनीवर या, असेही ते म्हणाले.