dipali sayed

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाच्या आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील (Surat) हॉटेलमध्ये गेले आहेत. यादरम्यान दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे

    मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पक्षाच्या आमदारांसह नॉट रिचेबल आहेत. एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील (Surat) हॉटेलमध्ये गेले आहेत. त्यांचं मत वळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न सुरु आहे. यादरम्यान शिवसेनेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनीही ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमध्ये भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.


    दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “माननीय एकनाथ शिंदेसाहेब भाजपात जाणार हे म्हणणाऱ्यांनी भाजपाची तेवढी लायकी आहे का? तेही तपासावे. उगाच भाजपाच्या आयटी सेलच्या लिंबू टिंबूंनी सोशल मीडियावर तर्क वितर्क लावण्याचा प्रयत्न करू नये. शिवसेनेचा वाघ भाजपाला झेपणार नाही.”

    विधानपरिषद निवडणुकीत भाजपाने महाविकास आघाडीला धक्का दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे अचानक बेपत्ता झाले असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. निवडणुकीत भाजपाचे पाचही उमेदवारी विजयी झाले आणि शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटली आहेत. एकनाथ शिंदेशी संपर्क होत नसल्याने त्यांनी बंड पुकारल्याची शक्यता आहे.