छत्रपती युवा संघातर्फे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकात दीपोत्सव

छत्रपती युवा संघातर्फे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

    छत्रपती युवा संघातर्फे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकात दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती युवा संघचे , अमोल परदेशी , राजेंद्र काकडे , यश रजपूत , अक्षय चव्हाण , अभिलाष कदम , सिद्धेश पांडे , अभिलाष मोरे , रोहीत माने , राज रजपूत , गौरव सौलाखे , अमित मिटकरी , प्रसाद वारंग , अभिजित जावळकर , यज्ञेश रजपूत , यश काळभोर , हे उपस्थित होते.

    कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिवाजी महाराजांच्या , भारत मातेच्या , खंडोबाच्या प्रतिमेस हार घालण्यात आला नंतर आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती सांगण्यात आली. नंतर दिप प्रज्वलन करून दिपोत्सव साजरा केला. या वेळी संस्थेचे गणेशजी पाटोळे यांचे विशेष सहकार्य लाभले , त्यांनी घडलेल्या घटना व तेथील जेलची संपूर्ण माहिती सांगितलीसंघाचा मुळ उद्देश असा आहे कि, ज्या क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यात प्राणाची आहुती दिली त्यांना आपल्या आनंदाच्या क्षणात विसरून चालणार नाही म्हणून एक दिवा क्रांतिकारकांसाठी या उपक्रमाची सुरुवातच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारक पासून केली जे मामलेदार कचेरी शुक्रवार पेठ येथे आहे. कार्यक्रमाचे नियोजन राज रजपूत यांनी केले