लोकसभा लढवण्याबाबत धनंजय मुंडेंचं मोठं विधान; ‘माझ्यासाठी दिल्ली…’

गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात मुंडे बहीण-भावाची लढत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या सर्व चर्चांवर आता खुद्द धनंजय मुंडे यांनीच खुलासा केला आहे.

    बीड : गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात मुंडे बहीण-भावाची लढत पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र, या सर्व चर्चांवर आता खुद्द धनंजय मुंडे यांनीच खुलासा केला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही विचार नसल्याचा खुलासा मुंडे यांनी केला आहे.

    याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, ‘दिल्ली माझ्यासाठी दूर आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याचा माझा कोणताही विचार नसून पक्षानेही तशी माझ्याशी काही चर्चा केलेली नाही. अजून किमान वीस ते पंचवीस वर्षे मी याबाबत विचार करु शकत नाही. कारखान्यावर एक हजार कोटींचं कर्ज नगर येथे 9 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यव्यापी सभा होणार असून, या सभेच्या पूर्वतयारीनिमित्त बीडमध्ये आयोजित बैठकीसाठी धनंजय मुंडे आले होते.

    ते पुढे म्हणाले, ‘विद्यमान खासदार हे निष्क्रय असल्याचे जनतेलाच दिसत आहे. लातूरला जो रेल्वे कोच निर्मितीचा प्रकल्प झाला, तो बीडला झाला असता तर जवळपास 50 हजार कोटींची गुंतवणूक बीडमध्ये झाली असती. तो प्रकल्प बीडला आणण्यात खासदारांना अपयश आले.

    यादी सोशल मीडियावर व्हायरल

    लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियातून व्हायरल झाली होती. या यादीत धनंजय मुंडे यांच्याही नावाचा समावेश होता. त्यामुळे धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली. एवढचं नाही तर लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मुंडे बहिण-भाऊ समोर येण असल्याची चर्चा सुरु झाली होती. पण धनंजय मुंडे यांनी स्वतः यावर खुलासा करत चर्चेला ब्रेक लावला आहे.