गणेशोत्सवामुळे फळे, फुलांना मागणी वाढली; दरात तब्बल ‘इतकी’ वाढ

मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी फळांची आवक वाढली. मागणी वाढल्याने डाळिंब, पेरु, लिंबू, संत्री, मोसंबीच्या दरात वाढ झाली.

    पुणे : गणेशोत्सवामुळे फळे, फुलांना मागणी वाढली असून, डाळिंब, पेरु, लिंबू, संत्री, मोसंबीच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. मार्केट यार्डातील फळबाजारात रविवारी फळांची आवक वाढली. मागणी वाढल्याने डाळिंब, पेरु, लिंबू, संत्री, मोसंबीच्या दरात वाढ झाली.

    केरळ येथून ५ ट्रक अननस, मोसंबी ७० टन, डाळिंब ५० टन, पपई २५ टेम्पो, लिंबे दीड हजार गोणी, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज १५ टेम्पो, पेरु ५०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), सीताफळ १५ टन, चिकू ३ हजार खोकी, तसेच सफरचंद २ हजार पेटी अशी आवक झाली.

    मार्केट यार्डातील फूलबाजारात फुलांची आवक वाढली असून, फुलांचे दर तेजीत आहेत, अशी माहिती फूल बाजारातील व्यापारी सागर भोसले यांनी दिली.