Demand for naming the railway flyover after Krantisurya Mahatma Jyotiba Phule

सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती दिनांक ११ एप्रिलला आहे. त्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून या मार्गावरील उड्डाण रेल्वे पुलाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा.

    वाशीम : वाशिम युवा समितीने वाशिम पुसद मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्याची  मागणी लावून धरली आहे. थोर समाज सुधारक सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती दिनांक ११ एप्रिलला आहे. त्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून या मार्गावरील नुकत्याच नव्याने सुरू झालेल्या उड्डाण रेल्वे पुलाला क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.   
    या मागणीकरिता शहरवासीयांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, वाशिम नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे. निवेदनावर नागेश काळे, नितीन मडके, उमेश मुळे, गजानन इंगळे, वैभव नेमाने, महादेव हरकल, राजू जाधव, अनिल बडगे, अतुल इंगोले, शशिकांत जाधव, रामा इंगळे, गुरु इंगळे, गोपाल जाधव, चिखलकर इंगळे यांनी निवेदन दिले आहे. माळी युवा मंच व महात्मा ज्योतिराव फुले यांना चाहणाऱ्या सर्व समाजातील नागरिकांच्या वतीने त्यांनी ही मागणी केली आहे.