जत विधानसभा प्रचारप्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांची होणार हकालपट्टी? जत मतदारसंघातील वाद चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन

    जत/सांगली : जत विधानसभा प्रचारप्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांची पदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
    कोणालाही विश्वासात न घेता विधानसभा प्रचारप्रमुखाची निवड
    निवेदनात म्हटले आहे की, तम्मनगौडा रवीपाटील यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २८८ जत विधानसभा प्रचारप्रमुख निवड करताना कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. तसेच, ते भाजपचे सगळे कार्यक्रम माजी आमदार, तालुका अध्यक्ष किंवा पक्षाचे पदाधिकारी यांना विश्वासात न घेता स्वतःच करीत आहेत. तसेच, विधानसभेची उमेदवारी मलाच आहे, असा प्रचार चालू केला आहे.
    तम्मनगौडा रवीपाटील यांची हकालपट्टी करण्याची मागणी
    त्यामुळे भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांच्या अशा अपप्रचारामुळे व वागणुकीमुळे पक्षाला धोका होणेची शक्यता निर्माण झाली आहे. तरी त्यांची सांगली लोकसभा निवडणुकीसाठी २८८ जत जि. सांगली या विधानसभेच्या प्रचारप्रमुख पदावरून त्वरीत हकालपट्टी करावी. निवेदनावर डॉक्टर रवींद्र आरळी, प्रकाश जमदाडे, प्रमोद सावंत, आप्पासो नामद यांच्यासह 23 जणांच्या सह्या आहेत. हा वाद नाही मिटला तर जत भाजपमध्ये मोठी फूट? पडेल असे बोलले जात आहे.