मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना निवेदन देताना योग शिक्षक जगन्नाथ लोहार व सचिन तिवाटणे.
मुख्याधिकारी डॉ. सचिन माने यांना निवेदन देताना योग शिक्षक जगन्नाथ लोहार व सचिन तिवाटणे.

म्हसवड पालिका हद्दीतील प्रत्येक वॉर्डमध्ये नागरीकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी एक योगाचा वर्ग सुरु करावा, अशी मागणी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ सातारा यांच्या वतीने म्हसवड पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    म्हसवड : म्हसवड पालिका हद्दीतील प्रत्येक वॉर्डमध्ये नागरीकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी एक योगाचा वर्ग सुरु करावा, अशी मागणी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ सातारा यांच्या वतीने म्हसवड पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

    याबाबत सदर संघटनेचे माण तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ लोहार यांनी पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की म्हसवड शहरात कोरोना काळात नागरीकांना योगाचा चांगला फायदा झाला आहे, कोरोना काळात योगामुळेच नागरीकांना प्राणायम म्हणजे काय त्याचे महत्व मानवी जिवनात किती आहे याची चांगलीच माहिती झाली आहे, याकाळात अनेक नागरीकांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी संघटनेच्या वतीने अनेक ठिकाणी शिबीरे घेण्यात आली होती, भविष्यातही अशाप्रकारे योगाचा आणखी लाभ म्हसवडच्या सामान्य जनतेला मिळावा यासाठी म्हसवड पालिकेने प्रत्येक वार्डात प्रशिक्षीत योग शिक्षकाच्या माध्यमातुन योगवर्ग सुरु करावेत अन येणार्या संकटाचा सामना करण्याचे बळ नागरीकांच्या अंगी येण्यास मदत करावी अशी मागणी करण्यात आली आहे.