खेड जिल्हा सत्र न्यायालयाचा थेट आदेशच; ‘वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडा’

दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. साई रिसॉर्टची मालकी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.

    रत्नागिरी : दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट (Sai Resort) पाडण्याचे आदेश खेडच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत. साई रिसॉर्टची मालकी शिवसेना (उ.बा.ठा.) पक्षाचे आमदार अनिल परब (Anil Parab) यांच्याकडे असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच हे रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा दावा करत ईडीने त्यावर जप्तीची कारवाई केली होती.

    रिसॉर्टच्या बांधकामासाठी मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय ईडीला आहे. ईडीने हायकोर्टात या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. ईडीने जवळपास 10.20 कोटी रुपये किमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली होती. यामध्ये 2 कोटी 73 लाख 91 हजार रुपये किमतीची जवळपास 42 गुंठे जमीन आणि 7 कोटी 46 लाख 47 हजार रुपये किमतीचे रिसॉर्ट याचा समावेश होता. या प्रकरणी सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचा

    आरोप सोमय्यांनी केला होता. तर अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावताना आपला या साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचे हे साई रिसॉर्ट आहे. या प्रकरणी यांना तूर्तास हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण आहे, तर सदानंद कदम यांना ईडीने अटक केली आहे. या प्रकरणात तपास अद्यापही सुरू असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे.

    या आरोपपत्रात सध्या 6 आरोपींविरोधात आरोप आहे. विशेष म्हणजे अनिल परब यांच्या विरोधात कोणताही आरोप नाही. मात्र या प्रकरणाचे सूत्रधार अनिल परब असल्याचे ईडीने म्हटले आहे.