
मान्सूनला झालेला विलंब आणि त्यानंतरच्या अनियमिततेमुळे संसर्गजन्य आजारांनी विदर्भात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण तयार असल्याने मलेरियाबरोबरच डेंग्यूचाही (Dengue) प्रसार वेगाने वाढत आहे.
नागपूर : मान्सूनला झालेला विलंब आणि त्यानंतरच्या अनियमिततेमुळे संसर्गजन्य आजारांनी विदर्भात अक्षरशः उच्छाद मांडला आहे. डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण तयार असल्याने मलेरियाबरोबरच डेंग्यूचाही (Dengue) प्रसार वेगाने वाढत आहे. आतापर्यंत अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. गेल्यावच्या तुलनेत यावेळी पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या दुपटीने वाढली आहे. हा आकडा केवळ 8 महिन्यांचा आहे. ज्या पद्धतीने पाऊस पडत आहे, त्यावरून हा आकडा तिप्पट असू शकतो, असा अंदाजही व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची रोज संख्या वाढत आहे. दुसरीकडे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासन करत आहे. नुकतेच एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान शहरातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेने न्यायालयाला दिली होती. 2022 मध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली येथे एकूण 552 डेंग्यूचे रुग्ण आढळले. परंतु, एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. या वर्षाच्या सुरुवातीपासून डेंग्यूचे रुग्ण आढळले.
सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट या 8 महिन्यांत 1,167 रुग्ण आढळले आहेत. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. पूर्व विदर्भात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. यामध्ये नागपूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे.
पावसामुळे प्रादुर्भाव वाढणार
यावेळी डेंग्यूचे प्रमाण मुलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून आले, असे औषध विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले. पूरस्थितीनंतर अनेक ठिकाणी पाणी साचले होते. पाऊसही अधूनमधून पडत आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. डेंग्यूची सुरुवात सर्दीपासून होते. 3 दिवस सर्दी कमी झाल्यास रक्त तपासणी करणे आवश्यक होते. डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्त तपासणी करून कोणता आजार आहे हे कळू शकते.