
देवळी शिवारातील ज्योती धाबा येथे थांबून असलेले इमरान रज्जा शेख (२७) रा. तेर जि. उस्मानाबाद यांचे गाडीतून व तिथे थांबून असलेल्या दोन गाड्यातून अज्ञात चोरट्यांनी ४६० लिटर किंमत ४७ हजार ३८० चे डिझेल चोरून नेल्याची तक्रार देवळी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
वर्धा : देवळी शिवारातील ज्योती धाबा येथे थांबून असलेल्या गाड्यातील डिझेल चोरी करणा-या टोळीला देवळी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ३ लाखांच्यावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, देवळी शिवारातील ज्योती धाबा येथे थांबून असलेले इमरान रज्जा शेख (२७) रा. तेर जि. उस्मानाबाद यांचे गाडीतून व तिथे थांबून असलेल्या दोन गाड्यातून अज्ञात चोरट्यांनी ४६० लिटर किंमत ४७ हजार ३८० चे डिझेल चोरून नेल्याची तक्रार देवळी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. देवळी परिसरात पेट्रोल दरम्यान सदर आरोपी राजपाल शंकर नगराळे (४०), अभिषोक कैलास मारबदे (१९), सुरज वसंत मडावी (२१) तिन्ही रा. बोरगाव (मादनी) ता. जि. यवतमाळ यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला.
सदर आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली कार क्र. एम. एच. ०३ एनए १०७७ किंमत ३ लाख, तीन प्लास्टिक कँन किंमत १ हजार ५०० रुपये, दजोन लोखंडी आरीचे पाते किंमत ३०, डिझेल विक्रीचे नगदी १ हजार ५०० रुपये असा एकूण ३ लाख ३ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी परि. पोलीस अधीक्षक अफकत आमना व त्यांचे अनिधस्त तपास पथकातील कर्मचारी कुणाल हिवसे, अनिल तवारी, उमेश गेडाम, दयाल धवने आदींनी केली.