आई तुळजाभवानीची घटस्थापना, २ वर्षांनंतर भक्तांमध्ये आनंदी वातावरण

मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांच्यासह मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजीत सिंह पाटील, तुळजाभवानीचे महंत, पूजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत घटकलशाची वाजत गाजत आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर घरोघरी घटस्थापना करण्यात आली.

    तुळजापूर – कुलस्वामिनी आई श्री. तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव सोमवारपासून (२६ सप्टेंबर) सुरू झाला. तसेच सोमवारी पहाटे तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात तुळाजाभवानी मातेची मूर्ती सिंहासनावर स्थापित करण्यात आली. त्यानंतर अभिषेक पूजा करून दुपारी १२.०० वाजता मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना करण्यात आली.

    तत्पूर्वी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांच्यासह मंदिराचे विश्वस्त आमदार राणा जगजीत सिंह पाटील, तुळजाभवानीचे महंत, पूजारी, मानकरी यांच्या उपस्थितीत घटकलशाची वाजत गाजत आणि जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर घरोघरी घटस्थापना करण्यात आली.

    गाभाऱ्यात पहाटे ४.०० वाजता तुळजाभवानी मंदिर संस्थाचे पदाधिकारी आणि मानाचे महंत तुकोजी बुवा यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. नऊ दिवसांच्या घोर निद्रेनंतर आई तुळजाभावानीचे दर्शन झाल्याने पडत्या पावसात भाविकांनी विधिवत लोटांगण घालून मोठ्या भक्ती भावाने दर्शन घेतले. महाराष्ट्रासह राज्यातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात तुळजापूरात दाखल झाले होते. ज्योत घेऊन जाण्यासाठी तरुण भक्तानींही आई तुळजाभवानीचे दर्शने घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.