केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्राच्या विकासाची गाडी जोरदार पळणार आहे : उपमुख्यमंत्री अजित पवार

  बीड : आज परळीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुपख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारसोबत डबल इंजिनचे सरकार राज्याचा चांगला विकास करेल, त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले की, नुकतेच 4 राज्यांमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात विकासाची गाडी जोरदार पळणार आहे. त्यामुळे आपण मोदींना पुन्हा निवडून देण्यासाठी निदान 45 खासदार निवडूण द्यायचे आहे.

  महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 मिलिनियम डाॅलरवर न्यायची

  नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार चांगले काम करीत आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 मिलिनियम डाॅलर झाली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. राज्यात सर्व समाजाच्या अनेक मागण्या आहेत. तुम्ही तुमच्या मागण्या सांविधानिक पद्धतीने मागू शकता. कोणीही राजकारणात कायमचा शत्रू नसतो किंवा कायमचा मित्र नसतो, असेही अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

  हा आपल्यासमोर मोठा आदर्श

  महाराष्ट्राच्या जनतेला मला सांगायचे आहे की, इतरांना आरक्षण देण्याची आमची तयारी आहे. शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला एकत्रित घेऊन रयतेचे राज्य चालवले, हा आपल्यासमोर मोठा आदर्श आहे. आज मोदींना 3 राज्यांनी चांगलेच पाठबळ दिले आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसा बीडमध्ये घडल्याचे पाहिले आहे.

  अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना प्रोत्साहन देत असताना म्हणाले की, धनंजय माझ्या जवळचा तर आहेच, परंतु तो फडणवीसांच्यादेखील जवळचा असल्याने त्याला प्रत्येक योजनेत फायदेशीर ठरणार आहे. आज 286 कोटी रुपये प्रभू वैजनाथाच्या विकासासाठी आपण दिले आहेत.