बारामतीत स्वच्छ्ता अभियानात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सपत्नीक सहभाग

शासनाच्यावतीने "एक तारीख , एक तास स्वच्छता अभियान"या उपक्रमांतर्गत बारामती शहरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाची सुरुवात बारामती शहरातील आमराई येथील अनंतनगर येथून सुरूवात करण्यात आली. यांनतर कऱ्हा नदी पात्र, रेल्वे लाईन याठिकाणी अजित पवार यांनी स्वतः स्वच्छ्ता केली.

    बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरात आयोजित केलेल्या स्वच्छ्ता अभियानात स्वतः खोरे हातात घेऊन सहभाग घेतला. तब्बल तीन तास त्यांनी स्फुर्तपणे स्वच्छ्ता केली.यावेळी त्यांच्या पत्नी व एन्व्हायरमेंटल फोरमच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी देखील स्वच्छ्ता अभियानात सहभाग घेतला.

    शासनाच्यावतीने “एक तारीख , एक तास स्वच्छता अभियान”या उपक्रमांतर्गत बारामती शहरात स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाची सुरुवात बारामती शहरातील आमराई येथील अनंतनगर येथून सुरूवात करण्यात आली. यांनतर कऱ्हा नदी पात्र, रेल्वे लाईन याठिकाणी अजित पवार यांनी स्वतः स्वच्छ्ता केली.

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कचरा उचलून स्वच्छता केली, त्यांनी स्वतः खोरे हातात घेऊन स्वच्छ्ता केली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी देखील अजित पवार यांच्यासह कार्यकर्त्यां सोबत स्वच्छता केली. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित विविध शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. बारामती शहर व परिसरातील युवक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक यांनी या स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे , मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्यासह इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार यांच्यासह सुनेत्रा पवार यांनी तीन तास स्वच्छ ता अभियानात सहभाग घेतला.

    बारामती शहरातील भाजी मंडई, चांद शाहवली दर्गाह, पानगल्ली, मिनी मार्केट, कसाब गल्ली, आमराईतील शाहूनगर, पोस्ट ऑफीस जवळील परिसर, प्रबुद्धनगर, वडकेनगर, पीडीसी बँक परिसर, कोअर हाऊस, टेलिफोन ऑफीस परिसर, बुरुड हौसिंग सोसायटी, चंद्रमणी नगर, भीमनगर, सर्वोदय नगर, सुहासनगर, सिद्धार्थ नगर, प्रतिभा नगर, जवाहरनगर, हरिकृपानगर, सिध्देश्वर गल्ली, वसंत नगर,टी. सी. कॉलेज रोड, जळेची गावठाण, सूर्यनगरी, महिला सोसायटी, तांबेनगर, रुई हॉस्पिटल परिसर, रुई गावठाण, तांदुळवाडी परिसर, प्रगती नगर, सायली हिल, संपूर्ण कसबा परिसर, शारदा नगर, विविध मंदिरे, दशक्रिया विधी घाट, स्मशानभूमी, मुख्य बाजार पेठा, दुर्गा टॉकीज परिसर, जामदार रोड, साठेनागर, पंचशील नगर, लक्ष्मी नारायणनगर, सटवाजीनगर, शासकिय कार्यालय परिसर, शाहू हायस्कूल परिसर, टी. सी कॉलेज परीसर आदी ठिकाणी स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. या अभियान मध्ये एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, माजी सैनिक संघटना, रोटरी क्लब, लायन्स क्लब,फोरम, सहेली ग्रुप, शालेय विद्यार्थी, पोलिस करियर अकादमीचे विद्यार्थी आदीसह इतर नागरिक उपस्थित होते. बारामती नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचा विशेष सहभाग होता. मुख्याधिकरी महेश रोकडे, आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे, अजय ललबिगे,कार्यालयीन अधिक्षक अश्विनी अडसूळ, आदित्य बनकर , विजय शितोळे, सचिन शहा, महेश आगवणे, दिपाली घाडगे आदिंसह नगर पालिकेचे व एनडी के कंपनीचे स्वच्छ्ता दुत या अभियानात सहभागी झाले होते.