Deputy Chief Minister Ajit Pawar's strong response to the allegations of Congress State President Nana Patole

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. पाठीत खंजीर खुपसला हे पटोलेंचे विधान हास्यास्पद असल्याचे सांगतानाच पटोलेंनी स्वतःची राजकीय पार्श्वभूमी तपासून पहावी. खंजीर, तलवारी खुपसल्याचे वक्तव्य आम्ही कधी करत नाही, अशा शब्दात त्यांनी पटोलेंच्या विधानावर पलटवार केला आहे (Deputy Chief Minister Ajit Pawar's strong response to the allegations of Congress State President Nana Patole).

  मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. पाठीत खंजीर खुपसला हे पटोलेंचे विधान हास्यास्पद असल्याचे सांगतानाच पटोलेंनी स्वतःची राजकीय पार्श्वभूमी तपासून पहावी. खंजीर, तलवारी खुपसल्याचे वक्तव्य आम्ही कधी करत नाही, अशा शब्दात त्यांनी पटोलेंच्या विधानावर पलटवार केला आहे (Deputy Chief Minister Ajit Pawar’s strong response to the allegations of Congress State President Nana Patole).

  भाजपमध्ये कोण होते हे माहीत आहे सगळ्यांना. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपापण म्हणणार का आमच्या पाठीत खंजीर खुपसला? असा सवालदेखील त्यांनी यावेळी पटोलेंना केला. झाकली मुठ सव्वा लाखाची सर्वांनी आपली ठेवावी, असा सल्लाही त्यांनी पटोलेंना दिला. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी बुधवारी केला होता.

  एकोप्याने राहणे गरजेचे आहे. संघटनेमध्ये प्रत्येकाने मिळून काम करावे लागते. महाविकासआघाडी असेल तरच 145चा आकडा गाठणे शक्य आहे. आमचे आघाडीचे सरकार आहे. पण राज्यापातळीवर निर्णय घेत असताना राज्य पातळीवरील नेते निर्णय घेतात. स्थानिक पातळीवर सर्व नेत्यांनी एकत्र काम केले तर सर्व प्रश्न सोडवणे सोपे जाईल. राष्ट्रवादीने जिल्हापातळीवरील पदाधिकाऱ्यांना निर्णयाच्या मुभा दिलेल्या आहेत. यासाठीच गोंदियात भाजप राष्ट्रवादी एकत्र आले असे अजित पवार म्हणाले.

  सामंजस्याची भूमिका घेण्याचा सल्ला

  दरम्यान, 1999 ते 2014 या काळात 15 वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीचे सरकार चालवले. त्या काळातही काही जिल्ह्यांत आम्ही एकमेकांच्या विरोधात उभे राहायचो. काही ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांच्या पक्षात घ्यायचो. जर एखादी व्यक्ती गैरसमज झाल्याने राष्ट्रवादी पक्ष सोडून इतर पक्षात जाण्यापेक्षा आघाडीतील मित्र पक्षात घेल्याने काही वाईट होत नाही. तसेच त्यांच्या पक्षातील काही नेते विरोधी पक्षात न जाता आघाडीतील पक्षात गेले तर त्यांनी समंजस्याची भूमिका घेतली पाहिजे असेही पवार पटोलेंना उद्देशून म्हणाले. जबाबदार व्यक्तींनी वक्तव्य करत असताना आपस्या वक्तव्याचा कुठंकाही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही याबाबतही काळजी घेणे आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले.

  स्थानीक पातळीवर निर्णय घेणार

  राज्यात बहुमतासाठी तिन्ही पक्षांची आघाडी आवश्यक आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिन्ही पक्षांची आघाडी करायची की नाही, याविषयी जिल्हा, स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय घेतले जाऊ शकतात. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यानुसारच स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील, असेही पवार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणाले.

  ओबीसी आरक्षणासाठी केंद्राने विधेयक आणावे

  महाराष्ट्रानंतर आता मध्यप्रदेश सरकारलाही आता ओबीसी आरक्षणावरून झटका बसला आहे. त्यामुळे याप्रश्नी पुढे काय करायचे यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लवकरच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यातून काही तरी तोडगा निघेल, अशी अपेक्षा असल्याचे पवार म्हणाले. तसेच, हा आता राष्ट्रव्यापी मुद्दा बनला असल्याने केंद्रानेही या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. केंद्र सरकार ओबीसी आरक्षणावर नवे विधेयकही आणू शकते. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्राकडे हा पर्याय आहे. त्याचीदेखील चाचपणी व्हायला हवी, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.