उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा जय पवारचे कारनामे उघड; कोण काय बोलते याला महत्त्व देवून चर्चा करत राहण्याची गरज नाही : अजित पवार यांचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत मालेगावच्या नगरसेवक आणि माजी आमदार यांचा प्रवेश झाला त्यानंतर माध्यमांनी पवार यांना छेडले असता ते म्हणाले की, या देशात नियमांचे उल्लंघन कोण करत असेल तर त्यांना आळा घालण्यासाठी कायदे आहेत.

  • तो तुरुंगात जाईल, भाजप नेते किरीट सोमय्याचा धक्कादायक दावा

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांचा मुलगा (Son) जय पवार (Jay Pawar) याचे कारनामे लवकरच उघड करणार आहे. तो तुरुंगात जाईल, असा धक्कादायक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांसमोर केला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र कोण काय बोलते याला महत्व देवून त्याची चर्चा करत राहण्याची गरज नाही असे सांगत सोमय्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषदेत मालेगावच्या नगरसेवक आणि माजी आमदार यांचा प्रवेश झाला त्यानंतर माध्यमांनी पवार यांना छेडले असता ते म्हणाले की, या देशात नियमांचे उल्लंघन कोण करत असेल तर त्यांना आळा घालण्यासाठी कायदे आहेत.

अशा लोकांना अधिक महत्व देण्याची गरज नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक हजार पंचावन कोटींची बेनामी संपत्ती जप्त करण्यात आली. आता त्यांचा मुलगा जय अजित पवार याचे कारनामे उघड होणार आहेत असे भाकीत सांगत किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा माध्यमांसमोर गौप्यस्फोट केला. अजित पवार यानी मात्र कायदा सर्वश्रेष्ठ असतो.

या देशात नियमाचे उल्लंघन कोण करत असेल तर कायदे आहेत. कायदे पाळले जात नसतील तर खपवून घेतले जात नाही. पण काही लोकांना नुसतेच विधाने करायची असतात असे सांगितले ते म्हणाले की, काही वाहिन्या तर कोणत्या दिवशी काय विधाने केली हे दाखवत आहेत. त्यामुळे अशा लोकांना अधिक महत्व देण्याची गरज नाही. उद्या ते कुणाचेही नाव घेणार आणि तुम्ही प्रश्न विचाराल हे योग्य नाही. आम्हाला कुणाच्या कुटुंबीयांबाबत बोलायचे नाही, असेही अजित पवार म्हणाले.