
पंढरपूर : कार्तिकी सोहळ्याच्या तयारीसंदर्भात आज मंदिर समितीची बैठक पार पडली. यंदा कार्तिकीची महापूजा नेमकी कोणत्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार हा पेच मंदिर समिती समोर निर्माण झाला होता. राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असून यंदा पूजेला देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण द्यावे की अजित पवार यांना हा पेच समितीसमोर निर्माण झाला. दरम्यान, आज यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत कोणत्याही उपमुख्यमंत्र्याला न बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.