CRIME

शहरातील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये स्थापित करण्यात आलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आली. वरोरा शहरात गेल्या दोन वर्षांपूर्वी आठवडी बाजारातील परिसरातील महादेवाची मूर्तीची अशाच प्रकारे विटंबना करण्यात आली होती.

    वरोरा : शहरातील उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या हिंदू स्मशानभूमीमध्ये स्थापित करण्यात आलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीची विटंबना झाल्याची घटना उघडकीस आली. वरोरा शहरात गेल्या दोन वर्षांपूर्वी आठवडी बाजारातील परिसरातील महादेवाची मूर्तीची अशाच प्रकारे विटंबना करण्यात आली होती.

    असंख्य हिंदू बांधवांनी या प्रकाराला शांततेने पोलिस प्रशासनाला सहकार्य करत आरोपींना पकडण्यात मदत केली होती. मात्र, अशाच प्रकारची घटना उडाणपुलाच्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीत घडल्याने असंख्य नागरिकांनी स्मशानभूमीकडे धाव घेत झालेल्या प्रकारावर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांना निवेदन देत झालेल्या प्रकारामागे शहरातील सामाजिक सौहार्द बिघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या असामाजिक तत्वाला शोधून त्वरित अटक करावी, अशी मागणी केली आहे.

    दरम्यान, या घटनेमागे असणाऱ्या व्यक्तीवर 24 तासाच्या आत कारवाई करून त्यास अटक करावी, अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, असा इशारा पोलिस विभागाला देण्यात आला आहे.