शिंदे गटाकडून फोटो शेअर करत, स्वतःची सुटका केल्याचा देशमुखांचा दावा ठरवला खोटा

आमदार नितिन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचा आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी नितीन देशमुखांना विमानातून कसे पाठवले याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. तसेच काही फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत नितिन देशमुखांचा दावा खोटा असल्याचा आरोप शिंदे गटानी केला आहे.

    मुंबई : शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता मविआमध्ये (MVA) मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. मविआ बरखास्त होऊन सरकार कोसळणार का? अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते व मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुरतनंतर (Surat) आता जवळपास 44 आमदारांना (MLA) घेऊन गुहावटीत (Guhawati) येथे थांबले आहेत. त्यानंतर आता राज्यातील राजकीय हालचालीना वेग आला आहे. वर्षावर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची बैठक घेतली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आहे. तसेच आता काँग्रेसकडून सुद्धा यावर प्रतिक्रिया येत आहेत.

    दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आमदारांना अंधारात ठेवून त्यांना सूरतमध्ये नेल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh)  आणि आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांनी केला आहे. कैलास पाटीलांनी आपल्याला कसे फसवूण नेले याचा पाढा वाचला. या दोघांनी थरारक घटनेची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली. तसेच आपण कशी सुटका करुन घेतली याची सुद्धा माहिती दिली. तसेच यावेळी भाजपने (BJP) कटकारस्थान करून मविआला (Mahavikas Aghadi Government) पाडण्याचा डाव आखल्याचंही त्यांनी सांगितलं.

    यानंतर शिंदे गट सुद्धा आक्रमक झाला असून, आमदार नितिन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केलेला हा दावा खोटा असल्याचा आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी नितीन देशमुखांना विमानातून कसे पाठवले याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. तसेच काही फोटो आणि व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत नितिन देशमुखांचा दावा खोटा असल्याचा आरोप शिंदे गटानी केला आहे. (Nitin Deshmukh claim of self-release is false Reacting by sharing photos from Shinde group) त्यामुळं नितीन देशमुखांच्या आरोपाला काही तासातच शिंदे गटाकडून जोरदार प्रतिउत्तर मिळाले आहे.