अमृता फडणवीस यांना एक कोटीच्या लाचेची ‘ऑफर’ करणारी डिझायनर पोलिसांच्या ताब्यात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटीची (One Crore Bribe) लाच देण्याची ऑफर देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Dy CM Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एक कोटीची (One Crore Bribe) लाच देण्याची ऑफर देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात अमृता फडणवीस यांनीच मलबार हिल पोलीस (Malbar Hill Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता या लाचप्रकरणी डिझायनर अनिक्षा हिच्यावर कारवाई करत ताब्यात घेण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून ही महिला डिझायनर सातत्यानं अमृता फडणवीस यांचा एक कोटी रुपयांची लाच देण्याची ऑफर करीत होती. अमृता फडणवीस यांनी अनिक्षा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दोघांविरोधात धमकावणे, कट रचणे आणि लाचेची ऑफर देणे आदी कलमान्वये गुन्हे दाखल केला आहे. तिच्या वडिलांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही बुकींची माहिती द्या, त्या माध्यमातून पैसे कमावता येतील, असं तिने अमृता यांना डिझायनरनं सांगितलं होतं.

अनिक्षाने 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी तिचा व्हिडिओ, व्हाईस नोट आणि असंख्य मेसेज अमृता फडणवीस यांना पाठवले होते. ते सर्व अनोळखी नंबरवरून पाठवण्यात आले होते. अमृता फडणवीस यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याच पत्नीला लाच देण्याची ऑफर देण्याचा प्रयत्न झाल्याने याप्रकरणी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास केला जात असून, एका महिलेला ताब्यात घेतले आहे.