‘निर्धार सरकारचा, कायापालट मुंबईचा’, भाजपाचे मिशन मुंबई महापालिका, १५० जागांचे टार्गेट

भाजपच्या 'मिशन मुंबई'ला सुरुवात झाली असून, दोन महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी त्या संदर्भात मुंबई दौरा केला होता. भाजपने 'मिशन मुंबई' अंतर्गत महापालिकेत 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून, त्यासाठी 82+30+40 चा फॉर्म्युला ठरवला असल्याची माहिती आहे. 

    मुंबई: आगामी मुंबई पालिका निवडणुकीत (BMC election) भाजपाचा (BJP) झेंडा फडकवायचा या इराद्याने भाजपाने मागील सहा महिन्यापासून कामाला लागली आहे.  कोणत्याही परिस्थितीत यंदा  मुंबई पालिका  (BMC Election) भाजपचा झेंडा रोवायचाच, महापालिकेची सत्ता हाती घ्यायचीच असां चंग बांधून भाजप कामाला लागल्याचं दिसून येतंय. भाजपच्या ‘मिशन मुंबई’ला सुरुवात झाली असून, दोन महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी त्या संदर्भात मुंबई दौरा केला होता. भाजपने ‘मिशन मुंबई’ अंतर्गत महापालिकेत 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून त्यासाठी 82+30+40 चा फॉर्म्युला ठरवला असल्याची माहिती आहे.

    १५० जागांचे टार्गेट…

    भाजपचा सध्याचा मेगाप्लान हा 227 जागांकरता तयार आहे. 2017 च्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका घेण्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली असली तरी कोर्टात वेगळा निर्णय झाला तर भाजपला वाढीव जागांकरता पुन्हा तयारी करावी लागेल. भाजपनं मुंबई जिंकण्यासाठी तयार केलेला हा रोडमॅप अखेरपर्यंत अनेक वळणंही घेऊ शकेल. यात शिंदे गटाला सोबत घेतांना भाजप आणि शिंदे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. तसंच गेल्या काही काळातली राज ठाकरेंसोबतची जवळीक पाहता निवडणुकीतही मनसेला सोबत घेऊन कायम ठेवायची की नाही याबाबतही भाजपमध्ये अजून निश्चितता नाही.

    “उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे”

    केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाल की, राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे. असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना इशारा दिला आहे.