सीमाभागातील जिल्ह्यांच्या विकासाच्या फाईल्स स्वाक्षरी विनाच ; नगर विकास व जलसंपदा विभाग आघाडीवर

महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे असलेल्या खात्यांचे विविध विकास कामांचे फाईल्स मोठ्या प्रमाणात स्वाक्षरीविना पेंडिंग असल्याचे पुढे आहे.

    अक्कलकोट : महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे असलेल्या खात्यांचे विविध विकास कामांचे फाईल्स मोठ्या प्रमाणात स्वाक्षरीविना पेंडिंग असल्याचे पुढे आहे. यामध्ये नगर विकास व जलसंपदा विभाग आघाडीवर आहेत.

    तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे पायउतार झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नंतर मोजक्याच विविध खात्याच्या मंत्र्यांनी शपत घेतली. अद्यापही राज्यमंत्री पदाचा एक ही मंत्री नसून सब कुछ कॅबिनेट मंत्री मंडळ असलेले राज्यातील पहिलेच मंत्रिमंडळ आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे महत्वाच्या खात्यांची जबाबदारी आहे. तर फडणवीस यांच्याकडे ४ हून अधिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद आहे.

    या सरकार हे गतीने विविध विकास कामावर भर दिलेला आहे. आरोग्य सहाय्यताच्या माध्यमातून अमुलाग्र बदल मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पहायला मिळत आहे. हे सर्व पाहता जनतेला आपले सरकार वाटत असताना महाराष्ट्र- कर्नाटक सिमा भागातील महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यकडे असलेल्या खात्यांचे विविध विकास कामांचे फाईल्स मोठ्या प्रमाणात स्वाक्षरी विना पेंडिंग का राहिल्या जात आहेत. कोणाकडून अडवणूक होत आहे का? असा सवाल वरील जिल्ह्यातून होत आहे. या पेंडिंग असलेल्या मध्ये नगर विकास व जलसंपदा विभाग आघाडीवर आहेत. तरी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादा प्रश्नी विविध घोषणा करित असताना सदर जिल्ह्याचा अनुषेश भरून काढण्याच्या कामी विकासक असलेल्या पेडिंग फाईल्स स्वाक्षरीने निकाली काढण्याची रास्त मागणी पुढे येत आहे.